भारतात गुगल नेस्ट मिनि स्मार्ट स्पीकर लॉन्च

यंदा गुगलने जागतिक बाजारपेठेत गूगल पिक्सेल ४ स्मार्टफोनसह नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकर लॉन्च केले. हे डिव्हाईस युट्युब म्युझिक व जिओ सावन सारख्या विविध म्यूझिक स्ट्रीमला सपोर्ट करते.

दरम्यान गत वर्षी लॉन्च झालेल्या गूगल होम मिनी चे अपग्रेड व्हर्जन आहे. या स्मार्ट स्पीकरला ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी करता येईल. भारतामध्ये याची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे.

जाणून घ्या फिचर :

▪ गुगल नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकर होम मिनी शी मिळता-जुळता आहे.
▪ कनेक्टर पोर्ट आणि केबल दिली आहे.
▪ म्यूझिक स्ट्रीमिंगसह स्मार्ट होम या उपकरणाला कंट्रोल करता येते.
▪ कनेक्टिव्हीटी फीचर्स असून ब्लूटूथ व वाय-फायची सुविधा देखील आहे
▪ होम मिनी अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्लेटफॉर्मला सपोर्ट करतो.
▪ ब्लूटूथसोबत ही क्रोमकास्ट व क्रोमेकास्ट ऑडिओ बिल्ट-इन फीचर्स आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा