नवी दिल्ली, २५ जुलै २०२० : भारत चीन तणावात जगभरातील देश हे भारता बरोबर असून जगभरातील अनेक देश चीन विरोधी भूमिकेत आहेत.अशातच आता अनेक कंपन्या आपल्या वस्तूंची निर्मती भारतात करणार असून स्वस्त दरात ते भारतीयांना उपलब्ध करुन देणार आहेत.ज्याचा आर्थिक फटका चीनला बसणार आहे.
अॅपलने चेन्नईजवळ फॉक्सकॉन प्लांटमध्ये आपल्या फ्लॅगशिप फोन आयफोन ११ चं उत्पादन सुरु केलं आहे. यामुळे चीनला मोठा दणका झटका बसला आहे. अॅपलने पहिल्यांदा भारतात टॉप ऑफ द लाईन मॉडल तयार केलं आहे.
केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाचं हे मोठं यश मानलं जात आहे.केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. टप्प्याटप्प्याने या फोनचं उत्पादन वाढवलं जाणार आहे.तर चीनची कोंडी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी