भारताच्या सर्वात शक्तिशाली संरक्षण उपग्रहाची काउंटडाउन सुरू

भारतीय अंतराळ संशोधन संस्था: इस्रोच्या सर्वात शक्तिशाली इमेजिंग उपग्रहाची काउंटडाउन सुरू झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी ४.४० पासून लॉन्चिंगची काउंटडाउन सुरू झाली आहे. आज दुपारी ३.२५ वाजता हा शक्तिशाली इमेजिंग उपग्रह प्रक्षेपित होईल. यासह, पीएसएलव्हीसी ४८ च्या चौथ्या टप्प्यातील (पीएस ४) ऑक्सिडायझर भरला आहे.
त्याचे नाव रेसॅट-२ बीआर १ आहे. हे अवकाशात तैनात झाल्यानंतर भारताच्या रडार इमेजिंगची शक्ती अनेक पटींनी वाढेल. तसेच, शत्रूंवर लक्ष ठेवणे अधिक सोपे होईल. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा बेटावर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल.
भारताचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) रॉकेट आज देशातील अत्याधुनिक गुप्तचर उपग्रह ‘रेसॅट-२ बीआर १’ आणि नऊ परदेशी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. रेसॅट-२ बीआर १ हा ६२८ किलो वजनाचा रडार इमेजिंग अर्थ कन्सर्वेशन उपग्रह आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा