भारताला धक्का; भुवीला दुखापत

नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.
दुखापतीमुळे संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार वन डे मालिकेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
आता भुवीच्या संघात बदली म्हणून कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता लागली आहे.

भारतीय संघ :
विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मयांक अग्रवाल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल

वेस्टइंडिज संघ
सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड (कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर.

वन डे मालिकेचे वेळापत्रक असे

● १५ डिसेंबर : चेन्नई
● १८डिसेंबर : विशाखापट्टणम
● २२ डिसेंबर : कट्टक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा