मुंबई : भारतात गत ५ वर्षामध्ये सुमारे ९४ लाख ९८ हजार वृक्षांची कत्तल केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान २०१५ ते २०१९ या काळात महाराष्ट्रात तब्बल १३ लाख ४२ हजार वृक्षतोड झाल्याचे वनविभागाच्या एका अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. देशभरात विविध विकासकामांमध्ये ही झाडे अडथळा ठरत असल्याचे सांगितले.
वृक्षतोडीमध्ये मध्य प्रदेश, ओडिशानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. नव्याने वृक्षारोपण करण्यातही महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे अहवालात म्हटले आहे. वृक्षारोपणात तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्र अग्रेसर आहे. पुनर्वृक्षारोपणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालात सांगितले आहे.
वृक्षतोड आकडेवारी (जुलै २०१९ पर्यंत)
● दिल्ली मेरठ एक्सप्रेस – वे : २२,०२७
● पूर्वांचल एक्सप्रेस-वे : ३६,५७४
● दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे : ३०,७८६
● नॉर्दन पेरिफेरल एक्सप्रेस-वे : १३,९६०
● चेन्नई पोर्ट : ४७९७
● मुंबई-नागपूर सुपर कम्यु. एक्सप्रेस-वे : २,५०,०००
● उत्तर भारत हायवे विस्तार : ३५००