नवी दिल्ली: केंद्रीय जल उर्जामंत्री गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले आहेत की, भारत वरून पाकिस्तानकडे जाणार्या नद्यांचे पाणी थांबविण्याच्या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या संदर्भात अनेक फिजिकल टेक्निकल स्टडी रिपोर्ट आले आहेत आणि येत्या काही दिवसांत बरेच अहवाल येत आहेत. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधूनही संमती मिळाली आहे.
ते म्हणाले की, आगामी काळात आम्ही नवा इतिहास रचू आणि आमचे पाणी पाकिस्तानकडे जाणं थांबवू. नमामि गंगा प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आज गंगाचा जगातील पहिल्या १० स्वच्छ नद्यांमध्ये समावेश झाला आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंध आधीपासूनच खराब होते. त्यात अलीकडच्या काळात ते आणखीन खराब होत चालले आहेत. पाकिस्तान नेहमीच भारताविरोधात छुप्या कारवाया करत राहिले आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. याच निर्णयां पैकी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भारतातून पाकिस्तान ला जाणारे पाणी पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. झालेल्या करारानुसार याआधी भारत-पाकिस्तान ला नियमित पाणी देत आला होता. इतकेच नव्हे तर अतिरिक्त पाणी ही भारत पाकिस्तानला देत होता. परंतु हे अतिरिक्त पाणी आता या प्रकल्पाद्वारे थांबवण्यात येणार आहे.
असे झाल्यास पाकिस्तान मध्ये पाण्याचा भयंकर तुटवडा निर्माण होणार आहे. आधीच पाकिस्तानमध्ये पाण्याचा मोठा तुटवडा गेल्या काही वर्षापासून निर्माण झाला आहे. तेथील भ्रष्टाचारामुळे धरणांचे बांधकाम निलंबित राहिले होते. याचा दुष्परिणाम तेथील जनता सध्या भोगत आहे. गेल्यावर्षी धरणाचे बांधकाम करण्यासाठी पाकिस्तान सरकारने चक्क जनतेकडून रुपया रुपया गोळा केला होता.