भारतीय संघाचा पराभव

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मोठा प्रयोग केला, जो अयशस्वी ठरला आणि भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. प्लेइंग इलेव्हन, रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल या तिन्ही सलामी फलंदाजांना समाविष्ट करण्यासाठी विराट कोहलीने फलंदाजीचा क्रम बदलला.

या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला २५६ धावांचे माफक लक्ष्य देऊ शकली, जे यजमान संघाने आरामात मिळवले. या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला आले तर राहुल तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आला. कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. फलंदाज श्रेयस अय्यर ५ व्या क्रमांकावर आला. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झाल्याने सर्व फलंदाज कन्फ्यूजही दिसून आले जे त्याच्या फलंदाजीमध्येही दिसले.

टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलामीची जोडी चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. पाचव्या षटकातील तिसर्‍या बॉलवर मिशेल स्टार्कने रोहित शर्माला बाद केले. रोहित शर्मा १० धावा काढून बाद झाला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी १२१ धावांची भागीदारी केली.

लोकेश राहुल २८ व्या षटकात बाद झाला. टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन त्याच्या वनडे कारकिर्दीतील २८ वें अर्धशतक ठोकून बाद झाला. धवनला अ‍ॅस्टन अगरच्या हाती पॅट कमिन्सने झेलबाद केले. धवनने ९१ चेंडूत ७४ धावा केल्या.

या सामन्यात विराट कोहली ३ नंबर ऐवजी ४ थ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. विराट कोहलीचा निर्णय असफल ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोहलीला जमली नाही आणि कोहली १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

ऋषभ पंत (२८) आणि रवींद्र जडेजा (२५) यांनी सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली पण हे दोघेही सलग एका मागे एक षटकात पॅव्हेलियनमध्ये परतले. शार्दुल ठाकूर (१३), कुलदीप यादव (१७)आणि मोहम्मद शमी (१०) यांनी २५० धावांची आकडेवारी गाठली. अन्यथा परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली असती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा