दिल्ली: पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना हनिट्रॅपच्या जाळ्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अडकवण्याचा प्लॅन बनवला आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण योजना आयएसआयच्या अधिकाऱ्यांमार्फत राबविली जात आहे.
आता गृह मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एनआयए) सोपविली आहे. पूर्वी, आंध्र प्रदेशच्या काउंटर इंटेलिजेंस सेलने हनीट्रॅपची अनेक प्रकरणे पकडली होती, ज्यात नौदलाचे बरेच कर्मचारी गुंतले होते.
मागील वर्ष सुद्धा असाच एक प्रकार उघडकीस आला होता. भारतीय डिफेन्स कंपनी डीआरडीओ मधील एका वैज्ञानिकाने भारताचे सर्वोत्कृष्ट क्रूज मिसाइल ब्रह्मोस चा डाटा लीक केल्याची घटना घडली होती. ब्रह्मोस हे मिसाईल भारत आणि रशिया यांच्यात बनवण्यात आली आहे. या मिसाईल कॅटेगिरी मधील ब्रह्मोस ही जगातील सर्वोत्कृष्ट मिसाईल मध्ये गणली जाते.