भाऊबीज निमित्त दिल्ली सरकारची महिलांना भेट

नवी दिल्ली : भाऊबीज निमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाची सुरुवात केली. आजपासून दिल्लीतील महिला दिल्ली ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात डीटीसीच्या बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. एवढेच नव्हे, तर या बसमध्ये महिलांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाणार आहे. यासाठी दिल्ली सरकारने डीटीसीच्या विविध बसमध्ये १३ हजार मार्शल तैनात केले आहेत. हे लोक सुरक्षाच नव्हे, तर लोकांची मदत देखील करणार आहेत.

मार्शल्सला संबोधित करताना सीएम केजरीवाल म्हणाले, “आज मी आपल्याला सार्वजनिक बसमद्ये महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यात आत्मविश्वास भरण्याची जबाबदारी सोपवत आहे. जेणेकरून त्यांना बसमध्ये घरासारखे सुरक्षित वातावरण मिळू शकेल.” सध्या दिल्लीतल ३४०० बसमध्ये मार्शल तैनात करण्यात आले आहेत.

केजरीवाल पुढे म्हणाले, “भाऊ बीज निमित्त डीटीसी बसमध्ये मार्शलची संख्या वाढून १३००० करण्यात आली आहे. दिल्ली सरकार महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कटीबद्ध आहे. ज्या स्तरावर बसमध्ये मार्शलची संख्या वाढवण्यात आली तशी दुसऱ्या कुठल्याही शहरात वाढवण्यात आली असेल असे वाटत नाही. दिल्ली एक मोठे कुटुंब आहे आणि मी या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आहे. एक मोठा मुलगा म्हणून येथील माता-भगिणींना मी मोफत बस प्रवासाची सुविधा देत आहे.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा