भाविकांसाठी आजपासून “रामायण एक्सप्रेस”

43

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे पुन्हा एकदा “रामायण एक्सप्रेस” सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आधीप्रमाणेच या एक्सप्रेसद्वारे प्रभू रामांसंबधित पौराणिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. या रेल्वेची सुरुवात आज (दि.१८) पासून होणार आहे. या एक्सप्रेसचे संचालन इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँन्ड टूरिझ्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रामायण एक्सप्रेसचा मार्ग – इंदौरवरून अयोध्या, सीतामढ़ी, जनकपुर, प्रयागराज, चित्रकूट, नासिक, हम्पी, रामेश्वर, मदुरई असा प्रवास करेल. या प्रवास १४ रात्र आणि १५ दिवसांचा असेल. या प्रवासा दरम्यान भाविकांना प्रभू रामांशी संबंधित सर्व तीर्थ स्थळांचे दर्शन घेता येईल. जसे की राम जन्मभूमी, हनुमान गढी, भारत मंदिर, सीता माता मंदिर, तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, सीतामढी, त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर, भारद्वाज आश्रम, श्रृंगी ऋषि मंदिर, रामघाट, सती अनुसुइया मंदिर, पंचवटी, अंजनद्री हिल, हनुमान जन्मस्थल, ज्योतिर्लिंग शिव मंदिर या ठिकाणांचा समावेश आहे.

या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवण, राहण्यासाठी चांगले ठिकाण, दर्शनीय स्थळांसाठी बस सेवा आणि चांगली सुरक्षा व्यवस्था मिळेल. १८ नोव्हेंबरला सकाळा ६ वाजता इंदौरवरून ही एक्सप्रेस निघणार आहे.

इंदौरवरून सुरू होणाऱ्या या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला स्टँडर्ड कॅटेगरीसाठी १४,१७५ रुपये भरावे लागतील. तर कंफर्ट कॅटेगरीसाठी १७,३२५ रुपये भरावे लागतील. रामायण एक्सप्रेसचे ऑनलाईन तिकिट बूक करण्यासाठी तुम्ही आयआरसीटीसीची वेबसाईट www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट देऊन आपले तिकीट बुक करू शकता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा