भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मानवंदना

पुणे, १ जानेवारी २०२१: भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी मानवंदना दिली. १ जानेवारी ११८१८ रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती यामध्ये ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशवांचा पराभव केला होता.

या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ या विजय स्तंभाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते. दरवर्षी देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.

आज सकाळी ७ वा. ऍड. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, अशोक सोनोने, वंचितचे प्रवक्ते, अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक आणि प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा