भीमा नदीमध्ये अवैध वाळू उपसा

कर्जत, दि.१२.जून २०२०: अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्हा य दोन्ही जिल्ह्यांना जोडणारी नदी म्हणजे भीमा नदी. या भीमा नदीमधील वाळू ही बांधकाम व्यावसायासाठी अत्यंत दर्जेदार समजली जाते. त्यामुळे वाळू तस्करांना भीमा नदी कायम आकर्षित करीत असते.

नदीच्या कडेलाच काही किलोमीटरपर्यंत जंगल परिसर असल्याने वाळू तस्करांना तो सर्वात मोठा आधारच होत आहे. पण त्यामुळे वन विभागाचे देखील फारच मोठे नुकसान होत आहे.हजारो लाखो वृक्षांची रस्ता बनविण्यासाठी तोड होत आहे.

या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, जलालपूर सिध्दटेक, बेर्डी, पेडगाव या ठिकाणी भरमसाठ वाळू असल्याने तस्करांना ती एक पर्वणीच ठरत आहे. नदीच्या पलीकडील बाजूस वाळू उपसा हा नदीला पाणी आल्याने दिवस रात्र सुरू आहे. हजारो ब्रास वाळू ही चोरीला जात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नदी मध्ये पाच जीसीबी आणि आठ ते दहा ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करताना दिसत आहेत.

दिवस रात्र हा वाळू उपसा चालूच असल्याचे निदर्शनास आले आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहता असल्याने तस्करांना वाळू काढण्यासाठी मदत होत आहे. वाहत्या पाण्यात चांगली स्वच्छ वाळू होत असल्याने तस्करांनी दिवस रात्र उपसाचा करण्याचा सपाटा लावल्याचे दिसतं आहे.

या बाबतीत मात्र पुणे जिल्हा प्रशासन आणि अहमदनगर जिल्हा प्रशासन कोणतीही दखल घेण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट पणे दिसतं आहे. वाळू तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने तस्कर हे कोणालाच भीत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा