भोकरदन, जालना ४ मार्च २०२३ : भोकरदन येथे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या सूचने वरुन भोकरदन तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. या निर्णायक बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
सरकार ने आचारसंहिता लागण्याआधी सगे सोयरे अध्यदेश काढून मराठा आरक्षण मार्ग मोकळा करावा. अन्यथा मराठा समाज बांधव जालना लोकसभेला प्रत्येक गांवातुन दोन फॉर्म भरणार आहे. कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला आमच्या घरा पर्यंत येवू देणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला. भोकरदन तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या समस्या जाणून घेत निर्णय घेण्यात आल्या. यावेळी भोकरदन तालुका सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या सांख्येने उपस्थिति होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे