कोल्हापुरात भोंदूबाबाने केली चार कोटींची फसवणूक

कोल्हापूर, दि. ३१मे २०२०: कोल्हापूर येथे एका भोंदूबाबाने आपल्या मुखातून साक्षात स्वामी समर्थ आणि साईबाबा बोलतात, असे भासवून तब्बल चार कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस, श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे, सविता अनिल अष्टेकर या तिघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण फडणीस हा स्वामी समर्थनाचा भक्त आहे.त्याचा कोल्हापूर येथील सिद्धाळा गार्डन परिसरात मठ आहे. त्याने अनेकदा आपल्या अंगात साई बाबांचा संचार असतो. यात अनेक भक्तांचा त्याने विश्वास संपादन केला. त्यातून त्याने भक्तांकडून वेळोवेळी पैसे घेतले. असे एकूण तीन कोटी ९६ लाख ३४ हजार रुपयांची त्याने फसवणूक केली आहे.

या तिघांविरुद्ध आतापर्यंत १२ जणांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. माहितीनुसार प्रवीण फडणीस हा स्वामी समर्थांचा भक्त आहे. त्याचा मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात मठ आहे. तिथे तो भक्तांना आपल्या अंगात स्वामी समर्थ आणि साईबाबा संचारतात असे सांगत असायचा . नियमित येणाऱ्या संदीप प्रकाश नंदगांवकर यांच्यासह २० भक्तांचा त्याने विश्वास संपादन केला व त्यातून गोशाळा व अन्य कामांसाठी वेळोवेळी पैसे घेतले.असे एकूण सुमारे तीन कोटी ९६ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.

याप्रकरणी फसवणुकीविरोधात संदीप नंदगांवकर यांच्या मुख्य फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांत महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा सन २०१३ चे कलम २ (१) (बी) (५) (६) प्रमाणे भारतीय दंडविधान कलम ४२०, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून या तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . याबाबत पोलीस अधिक्षकांकडे १२ तक्रारी आल्या होत्या.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा