माढा, ६ डिसेंबर २०२०: क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भोसरे (ता.माढा) येथील अतुल लक्ष्मण बागल यांना राजस्थान येथील उमेद हेल्पलाईन फाउंडेशन च्यावतीने प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिव्यांग खेळाडूंना दिला जातो.
यंदा अतुल बागल यानां राष्ट्रीय दिव्यांग रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उम्मेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जैन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी निवड समितीचे अध्यक्ष धन्नाराम पुरोहित, कार्याध्यक्ष धर्मेंद्र पाल ओझा, लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ बागल, लक्ष्मण काशिद, सागर बाबर वैभव, नाईकवाडी विवेक शिंदे, ॲड. विवेक पकाले, ॲड. ज्ञानेश्वर लोंढे, अतुल वाघ अमोल लोभे, दादा कदम उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून ते क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील