न्युझीलंड, दि. २५ मे २०२०: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन या सोमवारी सकाळी एका वृत्तवाहिनीला आपली मुलाखत देत होत्या. मुलाखत चालू असतानाच अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. अशा परिस्थितीत देखील त्यांनी आपली मुलाखत देणे सुरू ठेवले होते.
जेसिंडा आर्डन म्हणाल्या की, “रयान येथे भूकंप आला आहे. आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.” मुलाखत देत असलेल्या खोलीत डावी-उजवीकडे बघत त्यांनी म्हटले की, “आपण माझा मागील बाजूस असलेल्या वस्तू हलताना पाहू शकता.” एवढे सर्व होऊन देखील जेसिंडा आर्डन यांनी आपली मुलाखत सुरूच ठेवली होती. पुढे त्या म्हणाल्या की, ” आता आम्ही ठीक आहे रयान, माझ्या डोक्यावरील लाईट हलणे बंद झाले आहे. आता मला विश्वास आहे कि मी एका मजबूत आधार असलेल्या ठिकाणी बसले आहे.”
मुलाखत देत असताना घडलेला हा प्रकार लोकांच्या भरपूर चर्चेत राहिला. या संबंधित व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला तसेच त्यांच्या धाडसाचे देखील कौतुक केले.
विशेष म्हणजे न्युझीलंड हा देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ या क्षेत्रांमध्ये येतो. त्यामुळे न्यूझीलंडला अस्थिर द्वीप म्हटले जाते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार सोमवारी भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी होती आणि त्याचे केंद्रबिंदू ईशान्य वेलिंग्टनपासून १०० किलोमीटर समुद्री अंतरात होते. तथापि, जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी