बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री भूमी पेडणेकरला बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘फेस ऑफ आशिया’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या फेस्टिवलचे हे 24 वे वर्ष असून भूमीच्या ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर येथे होते. याविषयी भूमीने इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे.
भूमी म्हणाली :
▪ सिनेमा बुसान मधील प्रेक्षक व समीक्षकांना आवडला ही अभिमानाची गोष्ट आहे तसेच हा एक भावनिक क्षण आहे.
▪ हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय विजय असून येत्या काळात असेच सिनेमे करणार.
▪ प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर अशाच सिनेमांचा भाग होत राहीन.
दरम्यान, भूमीने अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये दम लगा के हैशा, टॉयलेट हे त्यापैकीच काही चित्रपट होय.
आगामी काळात, ‘सांड की आंख’, ‘बाला’, ‘पती पत्नी और वो’, ‘भूत- पार्ट वन: द हॉंटेड शिप’ व ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या सिनेमातून भूमी झळकणार आहे.