रेडमीचे दोन नवीन टीव्ही मॉडेल मजबूत फीचर्ससह भारतात लाँच, किंमत 15,999 रुपये

पुणे, 23 सप्टेंबर 2021: Redmi Smart TV 32 आणि Smart TV 43 भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. हे नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल ऑलराउंड एंटरटेनमेंट ऑफर करतील. यासह, वापरकर्त्यांना डॉल्बी ऑडिओ सपोर्ट, IMDB इंटीग्रेशन आणि Google असिस्टंट सपोर्ट देखील पहायला मिळेल. Xiaomi चे हे नवीन मॉडेल OnePlus TV Y1 32-43 इंच आणि Realme Smart TV 32-43 इंच मॉडेल्सशी स्पर्धा करतील.

भारतात Redmi Smart TV 32 ची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आलीय. त्याचबरोबर भारतात Redmi Smart TV 43 मॉडेलची किंमत 25,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. Amazon, शाओमीची अधिकृत वेबसाईट, एमआय होम स्टोअर्स आणि ऑफलाईन रिटेलर्सवरून ग्राहक नवीन टीव्ही मॉडेल्स भारतात खरेदी करू शकतील. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021 च्या पहिल्या दिवसापासून नवीन मॉडेल्सची विक्री सुरू होईल. विक्रीची तारीख अद्याप दिलेली नाही. या मॉडेल्सवर विशेष ऑफरही देण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

Redmi Smart TV 32, Redmi Smart TV 43 ची वैशिष्ट्ये

दोन्ही टीव्ही मॉडेल अँड्रॉइड टीव्ही 11 आधारित पॅचवॉल 4 वर चालतात. या नवीन OS मध्ये, वापरकर्त्यांना IMDB इंटीग्रेशन, युनिव्हर्सल सर्च, किड्स मोड आणि लँग्वेज युनिव्हर्स सारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. या मॉडेल्समध्ये शाओमीचे विविड पिक्चर इंजिन टेक्नॉलॉजी आणि 20W स्पीकर्स देखील मिळतील. यासह, वापरकर्त्यांना यात डॉल्बी ऑडिओ आणि DTS Virtual:X सपोर्ट देखील मिळेल. या सर्वांसह, वापरकर्त्यांना चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी डॉल्बी 5.1 सराउंड साउंडचा देखील सपोर्ट मिळेल.

या नवीन मॉडेल्समध्ये इनबिल्ट क्रोमकास्ट आणि प्रीलोडेड गुगल असिस्टंट सपोर्ट आहे. नवीन Mi रिमोट Redmi Smart TV 32 आणि Redmi Smart TV 43 या दोन्ही मध्ये देण्यात आला आहे. यात एक डेडिकेटेड Google assistance बटण आहे. तसेच, वापरकर्त्यांना येथे क्विक वेक आणि क्विक म्यूट सारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्ट आणि ब्लूटूथ v5.0 यात देण्यात आले आहेत. या मॉडेलमध्ये लेटेस्ट Miracast ॲप देखील आहे. यासह ऑटो लो लेटन्सी मोड देखील आहे. जेव्हा गेम कन्सोलसह टीव्ही वापरला जातो तेव्हा लेटेंसी रेट रिड्यूस करण्यास मदत करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा