गोल पोस्ट स्पॉटलाइट भूमी पेडणेकरची वर्षाची सुरवात……

भूमी पेडणेकरची वर्षाची सुरवात……

देहरादून, २ जानेवारी २०२१: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर शुक्रवारी दून येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली आणि तिने स्वतःचे कॉफी पितानाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिने लिहिले, २०२१ ची फर्स्ट कॉफी. भूमीचा हा विषय सध्या सोशल मिडियावर चर्चेचा झाला आहे. तर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

हर्षवर्धन कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट राजकुमार राव यांच्यासोबत मुख्य भूमिकेत भूमी दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माता अमित मेहता म्हणाले की, जानेवारीपासून शूटिंग सुरू होणार आहे. अभिनेता राजकुमार राव यांच्यासह इतर कलाकारही दून येथे पोहोचणार आहेत. उत्तराखंडच्या कोर्टात चित्रपटाच्या दृश्यांचे शूटिंग सुमारे दोन महिन्यांपर्यंत होईल.

शूटिंग साठी लोकेशन शोधले गेले आहे. भूमीने २०१५ साली उत्तराखंडमध्ये आपल्या पहिल्या चित्रपटाचे शूट ‘दम लगाके हैशा’ देखील केले होते. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्म फेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. याआधी भूमीने पति पत्नी और वो, दुर्गावती, टॉयलेट एक प्रेम कथा,शुभ मंगल सावधान आणि बाला सारख्या चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारली आहे. ज्यामुळे बाॅक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या मनावर तिच्या आभिनयाची एक छाप पडली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version