पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न

लखनऊ, ५ ऑगस्ट २०२० : कित्येक वर्षांच्या न्यायाच्या प्रक्रियांमध्ये प्रलंबित असलेला राम जन्मभूमी विवाद तसेच मंदिर होणार की नाही अशा चर्चांना आज पूर्णविराम लागला आहे. अखेर आज एक नवीन इतिहास घडत राम मंदिराचा पायाभरणीचा समारंभ पूर्ण झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोध्या मध्ये राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते.

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोध्या मध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५०० वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना व्यक्त केली.

“या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिले. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभे रहावे अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसेच शांततेच्या मार्गाने समस्येचे निराकरण कसे केले जाते हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे,” असे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा