कोजागरी पौर्णिमेला घरात कलह करू नये, तुळशीजवळ दिवा लावावा आणि रात्री लक्ष्मी पूजन करावे

रविवार, १३ ऑक्टोबर रोजी अश्विन मासातील पौर्णिमा आहे. या तिथीला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. इतर पौर्णिमेच्या तुलनेत या रात्री चंद्र जास्त मोठा दिसतो. आयुर्वेदामध्येही या रात्रीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. यामुळे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर खाल्ली जाते. ही खीर आरोग्यासाठी चांगली राहते. येथे जाणून घ्या, या तिथीशी संबंधित खास गोष्टी….

  • कोजागरी पौर्णिमेशी संबंधित मान्यतेनुसार, या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून भक्तांना विचारते, कोणकोण जागे आहे, यामुळे याला कोजागरी पौर्णिमा म्हणतात.
  • देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांच्या पूजेसाठी ही तिथी अत्यंत खास आहे. या दिवशी सत्यनारायणाची पूजाही करू शकता.
  • पूजन कर्माच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्यामुळे या दिवशी घरात प्रेमाने वागावे. वाद-विवाद करू नये. घरामध्ये कलह असल्यास देवतांची कृपा प्राप्त होत नाही. पूजन कर्माचे फळ हवे असल्यास घरामध्ये शांतता ठेवावी.
  • पौर्णिमेला सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावावा आणि प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशीला रात्री स्पर्श करू नये.
  • मान्यतेनुसार, द्वापार युगात याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रासक्रीडा केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.
  • तुम्ही हनुमानाचे भक्त असाल तर कोजागरी पौर्णिमेला हनुमान मूर्तीसमोर दिवा लावून सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचा पाठ करावा. देवाला चमेलीचे तेल अर्पण करावे.
  • एखाद्या गरीब व्यक्तीला गरम वस्त्र आणि चादर दान करावी. सामर्थ्यानुसार धन दान करावे. जेवू घालावे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा