अमावास्येत हरवलेला चंद्र अखेर आज पौर्णिमाला सापडले…

लातूर: राहुल गांधी यांनी आज लातूरमधील औसा येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी राहुल यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केल्याचाही गंभीर आरोप राहुल यांनी केला. राहुल गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवातच उपस्थितांना रोजगार मिळाला का, शेतीमालाला भाव मिळतो आहे का आणि अच्छे दिन आले का? असे प्रश्न करत केली. या सर्वच प्रश्नांना उपस्थितांनी नाही म्हणत प्रतिसाद दिला. औसा मतदारसंघात काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी ते आले होते.

सभेत राहुल गांधी म्हणाले, ” तरुणांना आणि शेतकऱ्यांना विचारले तर ते मोदींनी उद्ध्वस्त केल्याचे सांगतात. पण, माध्यमे याविषयी काहीच बोलत नाही. माध्यमं मोदींचेच गुणगान गातात. दुसरीकडे हीच माध्यमं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. गुजरातमध्ये कपडे आणि हिऱ्यांचा व्यवसाय संपला आहे. मोदींनी माध्यमांचे मालक असणाऱ्या अंबानी, अडाणी यांच्यासारख्या १० ते १५ उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटी रुपये कर्ज माफ केले. मनरेगा चालवण्यासाठी ३५ हजार कोटी रुपये लागतात. मोदींनी केवळ १५ लोकांना साडेपाच लाख कोटी मागील काळात दिले. शेतकऱ्याचे छोटंसे कर्ज थकले तरी त्याला तुरुंगात टाकले जाते. मात्र देशातील श्रीमंत लोक त्यांचं कर्ज फेडत नाहीत. त्याला सरकार ‘नॉन परफॉर्मिंग अॅसेट’ म्हणते.”

“देशातील गरीब लोकांच्या खिशातील पैसे काढून श्रीमंतांच्या खिशात घालणे हाच नोटबंदी आणि जीएसटीचा हेतू होता. म्हणूनच नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला. अनेक लोकं स्वतःचे पैसे काढण्यासाठी रांगेत उभे होते. मात्र, तिकडे नीरव मोदी आणि इतर उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात आले. मोदींच्या निर्णयाने देशातील छोटे उद्योजकांचा सत्यानाश केला. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत.”

राहुल गांधीच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…

> करबुडव्यांना आता कारवाईची भीती राहिली नाही.

> देशातल्या तरुणांना बेरोजगाराची भीती सतावत आहे.

> मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी कलम ३७०चे गुणगान

> येथील शेतकऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून सरकारने काय दिले?

> ‘गब्बर सिंह टॅक्स’मुळे लहान व्यापाऱ्यांचे कंबरडं मोडले.

> चांद्रयान मोहिमेच्या यशावरून सरकारवर साधला निशाणा.

> चिनी सैन्याच्या घुसखोरीबद्दल का विचारत नाहीत? सरकारला केला सवाल

> उद्योगपतींना १ लाख २५ हजार कोटींचा टॅक्स माफ केला पण, शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास त्यांना तुरुंगवास.

> शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले का? राहुल गांधीचा सवाल

> देशात बेरोजगारी, बेकारी मोठी समस्या.

> प्रसार माध्यमांवर टीका.

> दोन हजार कारखाने बंद पडले.

> साडे पाच लाख करोड रूपये १५ उद्योजकांचे मोदींनी माफ केले. (लोकसभेच्या भाषणात आकडा वेगळा होता)

> इस्रोला कॉंग्रेसने बनवले. चंद्रावर यान पाठवल्याने बेरोजगारी सुटणार नाही.

> मेक इन इंडीयाचे आता मेक इन चायना झालेय.

> आगामी ६/७ महिन्यात देशाची अर्थ व्यवस्था कोलमडेल.

> देशाची शक्ति एकतेत आहे. विभाजनाचा डाव.

> महाराष्ट्र काँग्रेसच्या विचारांचे राज्य.

> महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय होणार.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा