प्रभाग १९ मधील रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन संपन्न

बारामती ,१ जानेवारी २०२१ : नवीन वर्ष्याच्या पहिल्या दिवशी दि.१ जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक १९ मधील वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
इंदापुर रोड प्रभाग क्रमांक १९ मधील शेंडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते,अनुचंद्र हॉस्पिटलच्या पाठीमागील रस्ता ,गुणवडी रोड वरील एकता संस्थेच्या समोर सिमेंट कोंक्रेटचा रस्ता तर गुजर इस्टेट येथे डांबरीकरण रस्त्याचे आज नवीन वर्षात भूमिपूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद ,नगरसेविका अनिता दिनेश जगताप,नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी सातत्याने पाठपुरावा करून रस्त्याची कामे मार्गी लावली यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जेष्ठ नगर सेवक किरण गुजर ,उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद ,गटनेते मा.सचिन सातव,नगरसेविका सविता जाधव ,बांधकाम सभापति संतोष जगताप, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र बनकर नगरसेवक सत्यव्रत काळे, नगरसेविका मयुरी शिंदे ,अभिजीत चव्हाण ,सूरज शिंदे, अल्ताफ सय्यद, गणेश कदम, अँड रिजवान शेख,योगेश नाळे,सलीम शेख,तानाजी पवार,आकाश पिसे, अमन पाटोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा