काळ आला होता पण … पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना…

इंदापूर, २ जानेवारी २०२१: इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी पुलावर दिनांक १ रोजी पहाटे सोलापूर दिशेहून पुणे दिशेला जाणारी पिकअप गाडी (क्रमांकMH.१४ GU.९१५४ ) वाहन चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उजनी धरणाच्या पुलावरून पलटी होऊन पुलाच्या खाली पडली. यावेळी स्थानिक लोकांनी पुणे सोलापूर एक्सप्रेस वेळ प्रायव्हेट लिमिटेड इंदापुर टोल प्लाझा ची हायवे पेट्रोलिंग ( महाराष्ट्र सुरक्षा बल )यांना त्वरित माहिती दिली.

टोल प्लाझा कर्मचारी रुग्णवाहिका आणि क्रेन सहा घटनास्थळी दाखल झाले.
कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी पुलाच्या खाली जाऊन अपघातातील व्यक्तींना गाडीच्या बाहेर काढून जखमींना उपचारार्थ इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. सदर अपघाताची माहिती पुणे सोलापूर एक्सप्रेस वे चाच्या हायवे गस्त पथक ( महाराष्ट्र सुरक्षा बल ) चे ड्राइवर शिलावंत विंचोरे व अभिमन्यू शेळके यांनी गस्त पथकाचे इंचार्ज कृष्णा पालवे ( महाराष्ट्र सुरक्षा बल) याना माहिती दिली व इंदापुर टोल रुग्णवाहिका, क्रेन चे कर्मचारी ड्राइवर महेंद्र जगताप, समाधान रणपिसे, भरत ओहळ, सुनील पोळ, महिबूब बागवान, यांनी अपघातातील व्यक्तींना मदत करून त्याचा जीव वाचवला.

सदर घटना टेभुर्णी पोलिस हद्दीत घडली असून त्यांना माहिती दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने हाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघातग्रस्त प्रवाशांना काळ आला होता पण वेळ नाहि या म्हणीची प्रचिती आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा