ऊजनी (टें) येथील पाटील कुटूंबियांचा अनोखा संकल्प…

माढा, २२ नोव्हेंबर २०२०: माढा तालुक्यातील ऊजनी (टें) येथील राज्य कृषी मूल्य आयोगाचे मा सदस्स तथा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील व खरेदी विक्री संघाचे संचालक तथा ऊजनी सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील या पाटील कुटूंबियांच्या वतीनं गेली ११ वर्षे गावातील गोरगरीब महिलांना मिठाई व साडी देऊन भाऊबीज साजरी केली जाते.

गावातील सर्व महिलांना प्रत्येक दिवाळीच्या रविवारी भाऊबीज सणाचं औचित्य साधुन ऊपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमात १५० साड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रा. सुहास पाटील म्हणाले, पुढील वर्षीपासुन ऊजनीतील महिला व ऊजनी गावच्या हद्दीतील ऊसतोड कामगारांच्या महिलांना भाऊबीज सणांसाठी बोलावलं जाईल. अशा संकल्पाचा मनोदय व्यक्त केला आहे.

ते पुढं म्हणाले, ऊसतोड कामगारांना दिवाळीचा सण स्वतःच्या घरी साजरा करता येत नाही, म्हणून गावच्या हद्दीतील ऊसतोड कामगारांना बरोबर घेऊन दिवाळी सण साजरा केला जाईल. या संकल्पाची सुरूवात म्हणून त्यांच्या शेतातील ऊसतोड कामगारांना मिठाई व साड्यांचं वाटप वडील पांडुरंग पाटील व आई मंगल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.

यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा ऊजनी सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील, बाबासाहेब पानबुडे, परशुराम नवले, परमेश्वर मेटे, रोहित खंडागळे, बापु कवडे, विश्वजीत पाटील, यशराज पाटील, विश्वतेज पाटील, दादा गवळी, सिधु लोंढे, आजीनाथ परबत, दिपक मदने, आबा घाडगे, जगन्नाथ तनपूरे, सुभाष माने आदी मान्यवर ऊपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा