अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन, २८ वर्षांची प्रतीक्षा संपली; जबलपूरच्या उर्मिला चतुर्वेदी सोडणार उपोषण

34

जबलपूर, ५ ऑगस्ट २०२० : अयोध्यामधील राम मंदिराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणा-या उर्मिला चतुर्वेदी या २८ वर्षानंतर आपले आमरण उपोषण सोडतील . बुधवारी (५ ऑगस्ट) अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास सोहळा होणार आहे.

वृत्तसंस्था ‘आयएएनएस’ च्या म्हणण्यानुसार, १९९२ मध्ये जेव्हा अयोध्येत वादग्रस्त ढाचा पाडला गेला आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारा नंतर उर्मिला चतुर्वेदी यांनी खाणे सोडले. हिंसाचारामुळे नाराज असल्यामुळे जो पर्यंत राम मंदिर बांधण्याचे काम सुरू होत नाही तो पर्यंत आपण अन्न ग्रहण करणार नाही असा संकल्प त्यांनी केला व गेली २८ वर्षे ते फक्त फलाहार करून आहेत.

पण आज जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले त्यावेळेस त्यांचा हा २८ वर्षाचा उपवास सुटेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी