माढा, ४ ऑगस्ट २०२० : माढा तालुका भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी विष्णू तात्या बिचकुले यांची तर माढा शिक्षक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी भारत रावसाहेब माने यांची निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे सदस्य व सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते राजकुमार नाना पाटील तसेच माढा तालुकाध्यक्ष संजयदादा टोणपे यांनी विष्णू बिचकुले यांच्या निवडीचे पत्र देऊन तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली पत्रकार बिचकुले हे १९९८ पासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे कार्य ते करत आहेत. गेली पंधरा ते वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून ते काम करत आहेत. भारत रावसाहेब माने हे गेली पाच वर्षे शिक्षक आघाडीचे माढा तालुका प्रमुख म्हणून काम करत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे तसेच तालुक्यातील शेतकरी कष्टकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील वेगवेगळ्या स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी राजकुमार नाना पाटील,संजय दादा टोणपे, तालुकाध्यक्ष निवृत्ती तांबे माजी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुभाष बापू इंदलकर तालुका उपाध्यक्ष औदुंबर भागवत, टेंभूर्णी शहराध्यक्ष डाँ देशमुख, विजय काटे देशमुख, यासह टेंभुर्णी परिसरातील भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी