70 हजार रुपये किमतीची सायकल, फीचर्स ऐकून व्हाल थक्क!

पुणे, 23 जानेवारी 2022: जर तुम्ही अशा वाहनाच्या शोधात असाल जे तुम्हाला पेट्रोलच्या महागड्या खर्चापासून वाचवू शकंल. तर तुम्ही VAAN Electric च्या या इलेक्ट्रिक सायकलवर एक नजर टाकू शकता. ती चालवण्याचा खर्च 12 पैसे प्रति किलोमीटरपेक्षा कमी येतो. केवळ अर्ध्या युनिट विजेमध्ये ती पूर्णपणे चार्ज होते. त्याबद्दल जाणून घ्या…

VAAN ची इलेक्ट्रिक सायकल

VAAN Electric Motoने बाजारात आपली इलेक्ट्रिक सायकल श्रेणी अर्बनस्पोर्ट(Urbansport) लॉन्च केलीय. ह्या सायकलचे दोन प्रकार आहेत. सर्व प्रथम, कंपनीने कोचीमध्ये आपली विक्री सुरू केली आहे. लवकरच ती गोवा, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली सारख्या उच्च मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाईल.

अर्ध्या युनिट विजेमध्ये पूर्ण चार्ज

VAAN कंपनीचं म्हणणं आहे की त्यांची Urbansport आणि Urbansport Pro दोन्ही इलेक्ट्रिक सायकल 4 तासांत पूर्ण चार्ज होतात. दोन्ही इलेक्ट्रिक सायकलींमध्ये 48V 7.5Ah ची रिमूवेबल बॅटरी देण्यात आलीय. बॅटरीचं वजन सुमारे 2.5 किलो आहे. अशा प्रकारे, या बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर सुमारे अर्धा युनिट वीज वापरतात. देशभरात विजेचा सरासरी दर 8 ते 10 रुपये प्रति युनिट दरम्यान आहे, अशा प्रकारे या ई-बाईक चार्ज करण्यासाठी फक्त 4 ते 5 रुपये मोजावे लागतात.

12 पैसे प्रति किमी मायलेज

VAAN Electric सायकलचा टॉप स्पीड 25 kmph आहे. तर पॅडल सहाय्याने ती एका चार्जमध्ये जास्तीत जास्त 60 किमी अंतर कापते. अशाप्रकारे, ती चालविण्यासाठी सुमारे 12 पैसे प्रति किलोमीटर खर्च येतो.

या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 5 लेव्हल गीअर्स आहेत. हे 20-इंच स्पोक व्हीलसह येते आणि कॅरियरवर 15 किलो पर्यंत वजन वाहून नेऊ शकते. यामध्ये Urbansport ची किंमत 59,999 रुपये आणि Urbansport Pro ची किंमत 69,999 रुपये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा