मुंबई सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, अडीच कोंटीचे सोने विमानतळावर जप्त

मुंबई, ५ डिसेंबर २०२२ : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबईच्या उत्पादन सीमा विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन प्रकरणांमध्ये एकूण २.५ कोटी रुपयांचे एकूण ४,७१२ ग्रॅम सोने जप्त केले.

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून मुंबई सीमाशुल्क पथकाने कारवाई करत परदेशातून मुंबईत पोहोचलेल्या विमानाची झडती घेतली. या दरम्यान, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये २,८४० ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले. ते सोने सीमाशुल्क पथकाने जप्त केले.

एका प्रकरणात, संशयाच्या आधारावर प्रवाशांची झडती घेतली असता कस्टम पथकाने १,८७२ ग्रॅम सोने जप्त केले. तीन प्रवाशांनी परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या अंडरगारमेंटमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन ४,७१२ ग्रॅम आहे. त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. तस्करीच्या आरोपाखाली तीन विमान प्रवाशांना अटक करून पुढील तपास सुरू असून हे सोने कोठून आणले याबाबत आरोपींची चौकशी केली जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा