मुंबई, २८ सप्टेंबर २०२२: मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला परिसरात घरकाम करत असलेल्या एका नोकराला समतानगर पोलिसांनी बिहार मधून अटक केली आहे. घरमालीकीणीचे नजर चुकून आरोपी विजयकुमार श्रीप्रसाद बहरदार यांनी तब्बल आठ लाखांचे दागिने चोरी केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दीलेल्या माहितीनूसार घरमालकीण शिखा शिनेंश शिंघवी या लोखंडवाला परिसरात राहतात. त्यांनी आपल्या घरात बेडरुम मध्ये कपाडात लॉकरमध्ये सोने व हिऱ्यांचे दागिने ठेवले होते. एक दिवस मुलाला चैन पाहीजे म्हणून त्यांनी कपाट उघडले असता लॉकर गायब झाल्याचे दिसून आले. शिखा यानी व पती शिनेंश संपूर्ण घराची तपासणी केली. लॉकर कुढेही आढळले नाही. त्यामुळे या घटनेची तक्रार समता नगर पोलिस स्टेशन मध्ये दिली. पोलिसांनी ताबडतोब तपास पथक नेमले.
पथक घटनास्थळी दाखल झाले. आणि घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. यावेळी त्यांच्या घरातील नोकर लॉकर घेउन जात असताना दिसून आला. आरोपीचा मोबाईल नंबर घेउन तांत्रिक बाबीद्वारे तपासले असता आरोपी हा बिहारमध्ये असल्याचे समजले.
पोलिसांचे पथक तत्काळ बिहारला जाउन आरोपीला अटक केले. आरोपीने चोरलेले काही दागिने विकले असल्याचे समजले. तेही हस्तगत करण्यात आले. आणि एक दुचाकी ही जप्त करण्यात आली आहे. त्याला अटक करुन पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर