मुंबई, २ ऑक्टोबर २०२२: महसूल गुप्तचर विभाघाने शनिवारी नवी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. संत्र्याच्या पेटीत १९८ कीलो ड्रग्ज ‘हाय प्युरिटी’ कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची कुनकुन महसूल गुप्तचर यंत्रणेमधील काही अधिकाऱ्यांना लागली होती.
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी सलग दहा बारा दिवस पाळत ठेवली आणि त्यांना मिळालेली माहिती बरोबर निघाली, अधिकाऱ्यांनी आयात संत्री घेऊन जाणारा एक ट्रक अडवला असता, तपासणीत हे ड्रग्ज व्हॅलेस्निया संत्री घेऊन जाणारा ट्रक वाशी येथील प्रभू हिरा आईस अँड कोल्ड स्टोरेज परिसरातून हा माल घेऊन निघाला होता.
दक्षिण आफ्रिकेतून या ड्रग्जची तस्करी केली जाते. आतापर्यत भारतातील कोकेन जप्तीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. विशेष म्हणजे हे ड्रग्ज माणसाला अत्यंत व्यसंनाधीन बनवणारे एक कृत्रिम ड्रग्ज आहे.
ज्या लोकांना याचे व्यसन असते ते धूम्रपान करुन किव्हा इंजेक्शन द्वारे हे ड्रग्ज घेतात. त्याच्या तीव्र वेदना जाणवतात. या ड्रग्जची नशा जवळपास बारा तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुद्धा टिकून राहते, असे सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर