NIA ची मोठी कारवाई! दिल्ली, राजस्थानसह ५ राज्यातील २० ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०२२ राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गँगस्टर आणि दहशतवाद संबंधांचा तपास एनआयए करत असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा गँगस्टर्सची चौकशी केल्यानंतर इतर अनेक गँगस्टर्सची नावे समोर आली आहेत. एनआयए चौकशी करण्यात आलेल्या गँगस्टर्सच्या घरावर छापे टाकत असून, त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणं आणि सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले जात आहेत.

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एनआयएने उत्तर भारतातील चार राज्ये आणि दिल्लीत ५२ ठिकाणी छापा टाकत एक वकील आणि हरियाणा मधील एका गँगस्टरला अटक केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा