पुणे, ९ सप्टेंबर २०२२: आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. वनडे क्रमवारीत न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. किवी संघ आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर वन संघ राहिला नाही. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडला एकदिवसीय क्रमवारीत मोठा धक्का बसला, तर किवी संघाच्या पराभवाचा फायदा इंग्लंडला झाला. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लिश संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंड सध्याचा विश्वविजेता आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जातेय. ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल ११३ धावांनी जिंकला आणि मालिका देखील नावावर केली. या विजयानंतर आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडला नुकसान झाल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत सलग दोन विजय मिळवल्यानंतर इंग्लंड संघाला मात्र त्याचा मोठा फायदा मिळाला आहे.
पहिल्या क्रमांकावरील इंग्लंड संघाकडे सध्या ११९ रेटिंग गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या न्यूझीलंडकडे ११७ रेटिंग गुण आङेत. भारतीय संघाकडे १११ रेटिंग गुण आहेत आणि संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तान संघ १०७ रेटिंग गुणांसंह चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाकडे १०४ रेटिंग गुण आङेत. दक्षिण आफ्रिका संघाकडे १०१ रेटिंग गुण आहेत आणि तो सहाव्या क्रमांकावर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव