पुतिन यांना मोठा झटका, रशियन सैन्यावर वॅगनर ग्रुपचे हल्ले

10

मॉस्को २४ जून २०२३: रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष उलटले तरीही युद्ध सुरुच आहे. अशातच आता रशियात अंतर्गत बंड झाले आहे. वॅगनर ग्रुप ह्या रशियाच्या खासगी आर्मीनेच हे बंड केलंय. रशियन सैन्यावर वॅगनर ग्रुप हल्ले करत आहे. वॅगनर ग्रुप रशियाची मोठी ताकत समजला जातो, परंतु आता याच ग्रुपने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियन सैन्याविरोधात बंड केलय.

आम्ही मॉस्कोपर्यंत जाणार, मध्ये कोणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडणार नाही. वॅगनर ग्रुपचे तीस हजार योद्धे लढण्यासाठी सज्ज आहेत. असे म्हणत, वॅगनर ग्रुपच्या प्रमुखाने रशियाविरोधात युद्धाची घोषणा केलीय. मॉस्कोच्या दिशेने येणारा हाय-वे बंद झालाय, त्यामुळे मॉस्कोसमोर मोठ संकट तयार झालंय. रशियन सैन्याची दोन हॅलिकॉप्टर पाडल्याचा दावा वॅगनर ग्रुपने केला असून आता वॅगनर ग्रुप युक्रेनच्या सैन्याला साथ देतोय.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेन युद्धात विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण आता त्यांना सत्तापालटाचा धोका निर्माण झालाय. मॉस्कोत क्रेमलिनच्या सुरक्षेसाठी रणगाडे तैनात करण्यात आले असुन, मॉस्कोच्या रस्त्यावर चिलखती वाहने धावत आहेत.

रिपोर्टनुसार हा युक्रेनच्या बखमुतशी संबंधित विषय आहे. बखमुतमध्ये वॅगनर ग्रुपचा ट्रेनिंग कॅम्प होता. काही दिवसांपूर्वी या कॅम्पवर मिसाइल हल्ला झाला. या हल्ल्यामागे क्रेमलिनचा हात आहे, असे वॅगनर ग्रुपचे प्रामुख येवगेनी प्रिगोझिन मानतात. या हल्ल्यानंतरच त्यांनी मॉस्कोला उद्धवस्त करण्याची शपथ घेतली असे कळते. रोस्तोव भागात, यंत्रणा लोकांच्या सुरक्षिततेसाठी पावल उचलतायत. लोकांनी घाबरुन जाऊ नये, आपली सुरक्षापथक प्रत्येक स्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत असे गव्हर्नर वासिली गोलुबेव यांनी म्हटले आहे. रोस्तोवमध्ये रशियन सैन्याच मुख्यालय आहे. वॅगनर ग्रुपने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याच्या बातम्या येतायत. वॅगनर ग्रुप ही रशियाची खासगी आर्मी आहे. या ग्रुपमुळे सत्तेवरुन पायउतार होण्याची भिती पुतिन यांना वाटतेय.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर