पुणे फेब्रुवारी २०२५ : नवीन महिन्याची सुरुवात मोठ्या आर्थिक बदलांसह झाली आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून बँकिंग आणि डिजिटल पेमेंटच्या नियमांत महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून, UPI व्यवहारांसाठीही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत.
ATM नियमांत मोठा बदल! पैसे काढणे झाले महाग
आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी नवे शुल्क लागू झाले आहेत. बँक ग्राहकांना महिन्याला फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी आता 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे, जे यापूर्वी 20 रुपये होते. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढले, तर हे शुल्क 30 रुपये असेल. याशिवाय, एका दिवसात जास्तीत जास्त 50,000 रुपयेच काढता येणार आहेत.
UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI व्यवहारांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. 1 फेब्रुवारीपासून विशिष्ट अंक असलेल्या UPI आयडीवरील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुमच्या UPI ID मध्ये हे अंक असतील, तर तुमचे व्यवहार अयशस्वी होतील. त्यामुळे UPI वापरणाऱ्यांनी तातडीने आपली ID तपासून घ्यावी.
ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज
या नवीन बदलांमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अधिक जागरूक राहावे लागणार आहे. बँकिंग शुल्क वाढल्याने पैसे काढण्याची सवय बदलावी लागू शकते, तर UPI व्यवहार सुरळीत राहण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच आपल्या बँकेकडून अधिकृत माहिती मिळवा आणि नव्या नियमांनुसार आर्थिक नियोजन करा!
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे