अयोध्या-मथुराबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, आता मिळणार नाही दारू

अयोध्या, 1 जून 2022: राम नगरी अयोध्येबाबत योगी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता भगवान श्री राम मंदिर परिसरात दारू विकली जाणार नाही. श्री राम मंदिर परिसरात येणाऱ्या दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच कान्हा शहरातील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात बुधवारपासून मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय.

यासोबतच मथुरेतील दारू, बिअर आणि गांजाच्या 37 दुकानांना आजपासून म्हणजेच बुधवार, 1 जूनपासून टाळे ठोकण्यात येणार आहेत. दही आणि दुधाची दुकाने वाढवली जातील. मथुरा शहरातील तीन हॉटेल्सचे बार आणि दोन मॉडेल शॉप्सही आजपासून उघडणार नाहीत. मथुरेला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून जन्मभूमीच्या परिसरात दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की मंगळवारी उत्तर प्रदेश विधान परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी सांगितले होते की, अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर परिसरात येणाऱ्या सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. असा प्रश्न बसप सदस्य भीमराव आंबेडकर यांनी विचारला, त्याला मंत्री नितीन अग्रवाल यांनी उत्तर दिलं.

उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल म्हणाले होते, ‘अबकारी दुकान क्रमांक आणि स्थान नियम, 1968 नुसार सार्वजनिक प्रार्थनास्थळ, शाळा, रुग्णालय किंवा निवासी वसाहतीच्या 50, 75 आणि 100 मीटरच्या आत दुकान किंवा उप दुकान यांना परवाना दिला जात नाही. .’ या आदेशानुसार अयोध्येत दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा