लखनऊ, १८ नोव्हेंबर २०२०: कोरोना साथीमुळे, यूपीमध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अध्यापनाचं काम बर्याच दिवसांपासून बंद आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. पण आता राज्यातील योगी सरकारनं महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, योगी सरकारनं उत्तर प्रदेशातील २३ नोव्हेंबरपासून महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी अनिवार्य अट देखील ठेवण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त होणार नाही. म्हणजेच केवळ निम्मे विद्यार्थी वर्गात प्रवेश घेऊ शकतील, तर उर्वरित विद्यार्थी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्गात शिकत राहतील..
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्हाधिकारी, उच्च शिक्षण संचालक आणि सर्व राज्यांच्या खासगी विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत गाईडलाईन्स जारी केले आहेत. या गाईडलाईन्सनुसार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर आणि हँडवॉश अनिवार्य असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे