नवी दिल्ली, ३ जानेवारी २०२१: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, म्हणजेच डीसीजीआयने कोरोना लसीबाबत मोठी घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ची लस कोविशील्ड आणि भारत बायोटेक लस कोव्हॅकसिन या लसिंना आपत्कालीन वापरास डीसीजीआयने अंतिम मान्यता दिली आहे. आता ही लस देशातल्या सामान्य लोकांना देता येतील. यापूर्वी एसईसीने डीसीजीआयला १ जानेवारी आणि कोव्हॅक्सिनला २ जानेवारीला आपत्कालीन वापरास परवानगी देण्याची शिफारस केली होती. डीसीजीआयने आज त्यावर शिक्कामोर्तब केले.
जेव्हा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कुठल्याही औषध, ड्रग, लसीला अंतिम परवानगी देते, तेव्हाच ह्या अंतिम मान्यता दिलेल्या औषधांना किंव्हा लसिंना लोकांपर्यंत पोहोचविले जाते. अशी परवानगी देण्यापूर्वी, डीसीजीआय लसीवर घेतलेल्या चाचणी डेटाचा कठोरपणे अभ्यास करते. जेव्हा डीसीजीआय या अहवालावर समाधानी असतात तेव्हाच ते लसच्या सार्वजनिक वापरास अनुमती देते.
दरम्यान कोरोना लसीची ड्राय रन देशात २ जानेवारीपासून करण्यात आली. ड्राय रनचे परिणाम खूप सकारात्मक होते. या दिवशी, लस देण्याची संपूर्ण प्रक्रिया वास्तविक वेळेत केली गेली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे