पुणे, १ मे २०२३: सातारा रस्त्यावरील डी मार्ट शेजारी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात रात्री सव्वा दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे जोरदार स्फोट झाला. यांची भीषणता एवढी होती की, हे दुकान असलेल्या इमारतीचे आणि आजुबाजुच्या लोकांच्या घरांचे नुकसान भरपुर प्रमाणात झाले आहे. रात्री अग्निशमन दलाला माहिती मिळताच, त्यांनी मोठ्या शिताफीने आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, दुकानांतील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सहकारनगर पोलिसांकडून पंचनामा सूरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सव्वा दोनच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजुबाजुला राहत असलेल्या रहिवाशांच्या घरच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तर दुकान असलेल्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसुन, नुकसान मात्र जास्त झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर