डोंबिवली , ४ सप्टेंबर २०२० :
कल्याण डोंबिवलीत महावितरणाकडून नागरिकांची लूट सूरू आहे याच पार्श्वभूमीवर आज कल्याण डोंबिवलीत भाजपच्या बड्या नेत्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले . कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि डोंबिवलीमध्ये आमदार रविंद्र चव्हाण याच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन पार पडले . महावितरणाकडून नागरिकांना दिल्या गेलेल्या भरमसाट बिलामुळे नागरिकांची गोची होत आहे त्यामुळे हे आंदोलन आज कल्याण पूर्वेत आणि डोंबिवलीमध्ये पार पडले .
यावेळी शेकडो नागरिक देखील या आंदोलनाला उपस्थित होते . यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वीजबिल कमी करण्याबाबत अनेक पत्रे पाठवण्यात आली . ही वीजबिलं कमी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आली आहेत असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले .
लॉकडाउनच्या काळात जास्तीची बीले आली , कोणतेही रिडींग न घेता ही बिलवाढ करण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीने नागरिकांना शब्द दिला होता की ही बिलांची रक्कम आम्ही कमी करू दुसरीकडे मात्र महावितरणातील आधिकारी आधी बिल भरा मग तक्रार करा असे सांगत आहेत
या वाढीव बिलाबाबत सातत्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आली. परंतू त्यानंतरही महावितरणाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने भाजपतर्फे आज महावितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनंतरही महावितरणाने वीज बिल कमी करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार रविंद्र चव्हाण आणि गणपत गायकवाड यांनी यावेळी दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे