धनंजय मुंडेंना मोठा धक्का! कोर्टाचा निर्णय, दरमहा 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार

9

बीड ६ फेब्रुवारी २०२५: बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाने घरगुती हिंसाचार प्रकरणात त्यांना दोषी ठरवत करूणा शर्मांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.

करूणा शर्मा यांनी मागील काही वर्षांपासून न्यायालयात आपल्या हक्कांसाठी लढा दिला. त्या स्वतःला धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा दावा करीत होत्या. त्यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य करत हा निर्णय दिला आहे. यामुळे आधीच राजकीय संकटात सापडलेल्या मुंडेंच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातच कोर्टाचा हा निर्णय त्यांच्यासाठी आणखी अडचणींचा ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर धनंजय मुंडे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या दोन्ही घटनांमुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा