शाहरुख खानला मोठा झटका, BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती केल्या बंद

4

नवी दिल्ली, 10 ऑक्टोंबर 2021: ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या केसचा परिणाम आता त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. लर्निंग ॲप BYJU’S ने शारुख खानच्या सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही थांबवले आहे.

शाहरुखच्या प्रायोजकत्वाच्या व्यवहारांमध्ये BYJU’S हा सर्वात मोठा ब्रँड होता. शाहरुखला या ब्रँडला एंडोर्स देण्यासाठी वर्षाला 3 ते 4 कोटी मिळत असत. 2017 पासून ते कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. याशिवाय, त्याच्याकडे आयसीआयसीआय बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझम, ह्युंदाई अशा सुमारे 40 कंपन्यांची एंडोर्समेंट आहे.

कंपनीला निर्णय का घ्यावा लागला

आर्यनच्या अटकेनंतर सोशल मीडियावर शाहरुखचे ट्रोलिंग सुरू झाले. शाहरुखने जाहिरात केलेल्या ब्रॅण्डलाही लोकांनी टार्गेट करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर लोक BYJU’S ला प्रश्न विचारत होते की शाहरुखला ब्रँड ॲम्बेसेडर बनवून कंपनी काय संदेश देत आहे? अभिनेते हे सर्व त्यांच्या मुलाला शिकवतात का?

BYJU चा प्रवास कोचिंग क्लासेसने सुरू

39 वर्षीय रवींद्रन यांनी 2007 मध्ये CAT ची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस सुरू केले. त्यांचे बरेच विद्यार्थी 2009 मध्ये त्यांच्या बरोबर सामील झाले होते. 2011 मध्ये त्यांनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आपली कंपनी नोंदणी केली. 2015 मध्ये ॲप लाँच केल्यानंतर कंपनीला मोठे यश मिळाले. यानंतर, जगभरातील नामांकित गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये पैसे गुंतवले. 2018 मध्ये, त्यांच्या कंपनीचे मूल्य $ 1 अब्ज होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा