बिहार निवडणूक: महागठबंधन १२५, तर एनडीए ९४ जागांवर आघाडीवर

पटना, १० नोव्हेंबर २०२०: बिहार मधील मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. मतमोजणीनंतर उमेदवारांचा विजय आणि पराभव निश्चित होईल. बिहार विधानसभेच्या २४३ जागांवरील निवडणुका झाल्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात येत आहेत. सकाळी १० पर्यंत ३८ जिल्ह्यातील ५५ मतमोजणी केंद्रातून कोण आघाडीवर आहे व कोण पिछाडीवर आहे याबाबत चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल.

आजचा दिवस बिहारसाठी खूप महत्वाचा आहे. मंगळवारी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामुळं येथील नवीन सरकारची दिशा निश्चित होईल. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडीच्या दोघांपैकी कोणाच्या डोक्यावर जनता विजयाचा मुकुट ठेवेल ते आज स्पष्ट होईल. २४३ विधानसभेच्या जागांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली.

आरजेडी १०० जागांवर आघाडीवर

सकाळी नऊ पर्यंतच्या आकडेवारीनुसार आर जे डी शंभर जागांवर आघाडीवर, महागठबंधन १२५ जागांवर पुढं, तर एनडीएला ९४ जागांवर आघाडी, भाजपला ४७ जागांवर कल

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा