बिहार : सीतामढ़ीच्या सुरसंड भागात चांदीचा पाऊस पडल्याच्या अफवेने जोर धरला आहे. त्यामुळे लोकांनी सकाळपासून रस्त्यावर उतरून हातात भांडी घेऊन चांदी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या रस्त्यावर एवढी चांदी आली कुठून ? एखादा चोर किंवा तस्कर या रस्त्याने चांदी घेऊन गेला होता का ? त्याची पिशवी फाटून एवढी चांदी रस्त्यावर तर पडली नाही ना असा सवाल अनेक लोक एकमेकांना विचारात आहेत.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चांदी पडलेली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथील स्थानिक लोक सुद्धा आश्चर्य व्यक्त करताहेत की रस्त्यावर एवढी चांदी आली कोठून त्यामुळे आता याबाबतची माहिती घेऊन सुरसंड पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.
शेजारीच नेपाळची सीमा असल्यामुळे तस्करी किंवा चोरीची शंका देखील यामध्ये नाकारता येत नाही. पोलिसांकडून शहानिशा करून खर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रस्त्यावर पडलेली चांदी पाहून त्यांनाही प्रश्न पडला आहे की ही चांदी नेमकी कोठून आली. या घटनेमुळे नागरिकांची मात्र चांगली चांदी झाली आहे.