बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा राजीनामा

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे आपण जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, ग्लोबल एज्युकेशनसाठी आणि जलवायू परिवर्तनासाठी काम करायचे असल्याचे बिल गेट्स यांनी सांगितलं.

गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीतून जरी बाहेर पडले असले तरीही कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचे तांत्रिक सल्लागार म्हणून ते यापुढेही काम करणार आहेत. बिल गेट्स आता कंपनीसाठी काम करणार नसल्याने ते सामाज कार्यात सहभाग नोंदविणार आहेत. तसे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली आहे।

याबाबत बिल गेट्स यांनी सांगितले की , मी सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी येणार आहे. त्यामुळे मी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहे. ही माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली. १९७५ मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.
दरम्यान, बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा