अंतरराष्ट्रीय : आत्तापर्यंत अमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोज यांची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन ओळख होती. पण आता जगातील सर्वात धनवान व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत ५०० यादी ब्लूमबर्ग बिल्लेनियर इंडेक्स संस्था तयार करते. संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये बिल गेट्स यांचे नाव प्रथम स्थानावर आले आहे. या यादीत दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये बिल गेट्स यांना मागे सारत जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. सलग दोन वर्षे हे स्थान अबाधित ठेवणारे ते पहिलेच उद्योजक ठरले होते. २०१९ च्या यादीत मात्र प्रथम स्थानी बिल गेट्स यांचे नाव झळकले असून दुसऱ्या स्थानावर जेफ बेझोस आहेत. गेट्स यांच्याकडे सध्या एकशे दहा अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे ७.८९ लाख कोटी रूपये एवढी संपत्ती आहे. जेफ बेझोस यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन १०९ अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे ७.८२ लाख कोटी रुपये इतके आहे.
सर्वातमोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट ला गेल्या महिन्यात दहा अब्ज डॉलरची मोठे काम मिळाले त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे त्याचा परिणाम म्हणजे बिल गेट्स यांच्या मालमत्तेत भर पडला आहे.