नवी दिल्ली, १३ फेब्रुवरी २०२१: बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू आणि त्यांना नष्ट करण्यामुळे तसेच  बर्ड फ्लू पसरण्याच्या भीतीमुळे कुक्कुट उत्पादनाचे सेवन घटल्याने, अंडी आणि मांसाची किंमत कमी झाल्याने कुक्कुट उद्योगाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती या उद्योगाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार  बर्ड फ्लू मुळे राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी ४,४९,२७१ पक्षी नष्ट केले आहेत.
१४ राज्यात, कोंबड्या आणि जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे.  हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ या राज्यांमध्ये याचा मोठा प्रादुर्भाव झाला.
राज्यात आत्तापर्यंत ४१,५०४ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे तर १,०९,४२५ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. राज्यात बर्ड फ्ल्यू मुळे २२ जिल्हे प्रभावित झाले होते. हरियाणामध्ये दोन जिल्हे प्रभावित झाले असून २,१०,००० कुकुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे तर १,६४,००० पक्षी प्रशासनाकडून नष्ट करण्यात आले आहेत. पंजाब मध्ये एक जिल्हा प्रभावित झाला असून ४९,९३६ कुकुट पक्षांचा यामुळे मृत्यू झाला आहे तर ८४,५०५ पक्षी प्रशासनाकडून नष्ट करण्यात आली आहेत.
बर्ड फ्लू सह इतर पशु रोग नियंत्रणासाठी विभागाने, पशु रोग नियंत्रणासाठी राज्यांना मदतीअंतर्गत वित्तीय सहाय्य पुरवत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रयत्नांना सहकार्य केले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठीच्या कृती आराखड्या नुसार नष्ट करण्यात आलेल्या पक्षी आणि अंड्यांसाठी कुक्कुट पालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. केंद्रीय  मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध राज्य मंत्री डॉ संजीव कुमार बल्यान यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा