ठाणे, १ ऑगस्ट २०२० : संपुर्ण जग हे आपल्या धुंदीत जगत होते.कोणाला काहीच कल्पना नव्हती की एक अशी वेळ येणार आहे, जेंव्हा या चालत्या जगाचे चक्र अचानकच थांबणार आहे.गेल्या ६ ते ७ महिन्यापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. तर भारतात ही याचा उद्रेक पहायला मिळतोय.भारतात कोरोनाने संपुर्ण कुटुंबांच्या कुटुंबहि उध्वस्त केली आहेत. अनेकांचे संसार मोडले आहेत.
कोरोनाने आत्ता पर्यंत १०० पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात आता एका दुर्दैवी घटनेची भर पडली आहे. ठाणे जिल्हातील दोन जुळ्या भावांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विशेष म्हणजे दोघांचा जन्म एका महिन्यात पोलिस ट्रेनिंग एकत्र आणि भर्ती देखील एकत्र झाली होती. तर मृत्यू देखील एकाच आजाराने म्हणजेच कोरोनाने आणि तेही ८ दिवसाच्या फरकाने झाले आहे.म्हणजेच जन्म ही एकत्र अखेर शेवट सुद्धा एकत्र झाला.
अंबरनाथ पोलिस स्टेशनचे पोलिस हवलदार जयसिंग घोडके आणि हिल लाईन उल्हासनगर पोलिस स्टेशनचे पोलिस हवलदार दिलीप घोडके असे दोघा सख्ख्या भावांची नावे असून ते कार्यरत असलेल्या पोलिस स्टेशनची ती नाव आहेत. पण या घटनेमुळे ठाणे जिल्हात हळहळ व्यक्त केले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी