भाजप आणि जनता दल युती संपुष्टात, भाजपला धक्का

बिहार, ९ ऑगस्ट, २०२२: एकीकडे भारतात सगळीकडे भाजपाचा डंका वाजत असताना दुसरीकडे बिहारमध्ये भाजपला धक्का बसला आहे. बिहार सरकारमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. याबाबतची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. मागील काही दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय घडामोडींनतर अखेर युती तोडण्यात आली.

भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडण्यापूर्वी नितीश कुमार यांनी आपल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीपूर्वीच एका वरिष्ठ नेत्याने “स्फोटक बातमीसाठी सज्ज राहा” असे संकेत दिले होते. खरंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जनता दल (संयुक्त) मध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या कुजबुजीनंतर नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली.

या युतीमुळे बिहारमध्ये आता राजकिय संघर्षाची ठिणगी पडली आहे. किंबहुना याचे पडसाद २०२४ च्या निवडणुकीवर पडणार असं चित्र आत्ता तरी दिसू लागलंय. पण जर ही ठिणगी वणवा झाली तर भाजपाला बिहारचा विचार सोडून द्यावा लागेल. ही भाजपची हार असू शकेल, ज्यामुळे भारत भाजप हे समीकरण नक्कीच कुठेतरी मोडताना दिसेल. आता नितीश कुमार पुढे काय पाऊल टाकतात, यावर निवडणुकीचं गणित समजेल, हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा