तेलंगणामध्ये भाजपा नेत्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत

तेलंगणा ९ आँगस्ट २०२२ भाजपचे नेते ज्ञानेंद्र प्रसाद यांचा राहत्या घरात मृत अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तेलंगणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

भाजपचे नेते ज्ञानेंद्र याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली असून ज्ञानेंद्र प्रसाद यांनी आत्महत्या केल्याची शंका पोलीसांनी व्यक्त केला आहे. या आत्महत्येमागचे खरे कारण
समजले नसून पुढील तपास पोलिस करत आहे.

ज्ञानेंद्र प्रसाद सरलिंगमपल्ली मतदार संघातून पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य होते. सोमवारी सकाळी त्यांना नाश्ता देण्यासाठी पीएने रूमचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी खोलीच्या खिडकीतून डोकावले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा